पांडूरंग येडगे व रामचंद्र यशवंत येडगे यांचे मार्गदर्शन..
देवरुख- संगमेश्वर तालुक्यात कूटगीरी येडगेवाडी येथील जलजीवन मिशन अंतर्गत येणाऱ्या येडगेवाडी नळ पाणी योजनेतील विहीरचे स्थान स्थानांतरीत करावे याबाबत ग्रामस्थ रामचंद्र येडगे यांनी तसेच यासंदर्भात लवकरच कार्यवाही करावी यासाठी ग्रामस्थांनी कोकण आयुक्त यांना निवेदन सादर केले आहे.
जलजिवन मिशन अंतर्गत येणाऱ्या येडगेवाडी नळ पाणी योजनेतील विहीरचे स्थान हे पाचांबे गायकवाड वाडी या ठिकाणी नक्की करण्यात आले आहे.मात्र येडगेवाडी ते पाचांबे गायकवाड वाडी हे अंतर 4 ते 5 किलोमीटर असल्याने पाणी योजनेची देखभाल खर्च व विज बिल ग्रामस्थांना परवडणारे नसल्याचे नमूद करीत जलजिवन योजनेच्या अंतर्गत 2 जून 2023 रोजी झालेल्या सभेमध्ये ठरल्याप्रमाणे शासकीय अधिकारी, भूजल तपासणी अधिकारी व ग्रामस्थ यांच्या सांगण्यावरून संबधित कामाच्या ठेकेदाराने येडगेवाडीत विहीरचे खोदकाम केलेले आहे त्या विहीरी मध्ये सध्या 50ते 60 हजार लिटर पाणीसाठा आहे भविष्याचा विचार करून विहिरीचा पाण्याचा साठा वाढवण्याकरता अधिकाऱ्यांनी काही सुचना पण दिलेल्या आहेत तसेच भविष्यात पाणीटंचाई होऊ नये यासाठी येडगे वाडीतील दूसरी एक जिल्हा परिषद विहीर आहे त्या विहीरीत मुबलक पाणीसाठा आहे परंतु त्या विहीरीचे पाणी पिणे योग्य नाही त्यामुळे सदर विहीर पूर्णपणे रिपेरिंग करून व विहीरचे पाणी पिणे योग्य करून दोन्ही विहीरीचे पाणी एकत्र करून, नळ पाणी योजनेतील टाकीत सोडावे त्यामुळे भविष्यात येडगे वाडी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही तसेच येडगेवाडी नळ पाणी योजनेतील खर्चात कपात होऊन शासन महसूल देखील वाचेल
येडगेवाडीतील, संतोष येडगे हे ग्रामस्थ पसरवत असलेल्या बातम्या निराधार असून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात यावी असे ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे.
संतोष येडगे यांच्याकडून अधिकाऱ्यांची दिशाभूल, कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी..
संतोष विठ्ठल येडगे यानी 25 डिसेंबर 2022 वेळ दुपारी 2.00वाजता जलजिवन मिशन योजनेच्या कामाचे जे भूमीपूजन केले हे सर्व ढोंग असून येडगे वाडीतील गरीब जनतेची फसवणूक केली गेली आहे कारण अधिकाऱ्यांना माहितच नाही कधी भूमीपूजन झाले व एक ही अधिकारी ह्य भूमीपूजनसाठी उपस्थित नव्हते लोकांची दिशाभूल करण्याचे काम संतोष विठ्ठल येडगे यानी केले आहे, येडगेवाडीतिल जनतेचे सर्व जनतेला आव्हान आहे अशा खोट्या भूलथापाना बलीपडू नका संतोष विठ्ठल येडगे यांनी 4/3/2024 रोजी पेपरला दिलेली बातमीत काहीच तथ्य नाही कारण ज्या ज्या वेळी पाणी पुरवठा उप अभियंता येडगेवाडीत मिटींगसाठी आले तेव्हा त्यांनी योग्यतेच आम्हा जनतेला मार्गदर्शन केले,पंरतू संतोष विठ्ठल येडगे यानी स्वार्थापोटी केलेली तक्रार असावी.
रामचंद्र येडगे, अंनत येडगे, पांडूरंग येडगे, भास्कर येडगे, नामदेव येडगे,धोडींबा जाणू येडगे, बाबू येडगे तसेच भाजपा पदाधिकारी, भाजप कार्यकर्ते यांच्या या निवेदनावर सह्या आहेत