कोचीन शिपयार्डमध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून चौथी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. तर किमान दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनाही या भरतीच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
कोचीन शिपयार्ड भरतीला सुरुवात झाली आहे. चांगल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. स्काफोल्डर (Scaffolder), सेमी स्किल्ड रीगर (Semi Skilled Rigger)च्या रिक्त पदासांठी उमेदवारांना आमंत्रित केले गेले आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची विंडो खुली करण्यात आली आहे. या भरतीला सुरुवात करण्यात आली असून, उमेदवारांनी या भरतीमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केला आहे. cochinshipyard.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांना अर्ज करायचे आहे. या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांनी या जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. या अधिसूचनेमध्ये सर्व महत्वाच्या माहितीचा आढावा देण्यात आला आहे.
ITBP टेलिकॉममध्ये सुवर्णभारती; आजच करा अर्ज-
उमेदवारांना एका ठराविक काळापर्यंतच या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. २९ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत या भरतीसाठी देण्यात आली आहे. एकूण ७१ रिक्त जागांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित केली गेली आहे. Scaffolder च्या एकूण २१ रिक्त जागांचा विचार या भरतीच्या माध्यमातून केला जाणार आहे. Semi Skilled Rigger च्या एकूण ५० रिक्त जागांना या भरतीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे. मुळात, या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही अटी शर्तीना पात्र असणे अनिवार्य आहे. या अटी शर्ती शैक्षणिक आहेत तसेच वयोमर्यादे संदर्भात आहेत. या सर्व अटी शर्ती जाहीर अधिसूचनेमध्ये नमूद आहेत.
अधिसूचनेमध्ये नमूद असलेल्या शैक्षणिक अटींनुसार, Semi Skilled Rigger च्या रिक्त पाडण्यासाठी अर्ज करण्यास पात्र उमेदवार किमान चौथी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. तसेच तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त ३० वर्षे आयु असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येणार आहे.
स्काफोल्डरच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना काही शैक्षणिक अटी पात्र कराव्या लागणार आहेत. एकंदरीत, या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा. तसेच त्याच्याकडे तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त ३० वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. मुळात, या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना काही ठरविक रक्कमेत वेतन देण्यात येणार आहे. तीन वर्षांच्या कालकार्यात या वेतनात टप्प्यांमध्ये वाढ केली जाणार आहे.
विभागाच्या अनुसार हे वेतन-
असणार आहे. साधारणतः २२,१०० रुपये इतके वेतन पहिल्या वर्षी देण्यात येईल. दुसऱ्या वर्षी रक्कमेत वाढ होऊन २२,८०० रुपये वेतन देण्यात येईल. तर तिसऱ्या वर्षी हे वेतन २३,४०० रुपये इतके करण्यात येईल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा आणि अधिक माहिती मिळवावी.