
दिल्लीः सर्वसामान्य जनता महागाईच्या झळा सोसत असतांना सीएनजी आणि पीएनजीचे दर स्वस्त झाले आहेत. सीएनजी आठ रुपये तर पीएनजी ५ रुपयांनी स्वस्त झालेलं आहे.या निर्णयानंतर सीएनजी 79 रुपये प्रति किलो आणि पीएनजी 49 रुपये प्रति एससीएम दराने उपलब्ध होणार आहे.1 एप्रिलपासून एपीएम गॅसची किंमत भारतीय क्रूड बास्केटच्या मासिक सरासरीच्या 10 टक्के असेल.
महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी, MGL ने मुंबईत CNG च्या किमती प्रति किलो 8 रुपये आणि PNG च्या किमती 5 रुपये/SCM ने कमी केल्या आहेत.
स्थानिक पातळीवर उत्पादित नैसर्गिक वायूसाठी नवीन किंमत प्रणाली जाहीर केल्यानंतर एमजीएलने हे पाऊल उचलले आहे.