
नेरळ: सुमित क्षिरसागर – नेरळ बाजारपेठेच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण मुख्य बाजारपेठेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्यवर्ती शाखा नेरळकडे दुचाकी व तीन चाकी वाहने येण्या—जाण्याचा रस्ता पायऱ्यांमुळे बंद झालेला आहे. परंतु आता नेरळ शिवसेना मध्यवर्ती शाखेसमोरच्या जागेचा वापर हा दुचाकी चालकांच्या वाहनांचे अनधिकृत पार्किंग झोन बनलेला आहे.





वास्तविक सदरील नेरळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्यवर्ती कार्यालय, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नेरळ शाखा तसेच विविध विकास सहकारी बँक,नेरळ आणि पुढे असलेली कन्या शाळा अशी माणसांच्या वरदळीने गजबलेल्या जागी दुकानांच्या समोर असणाऱ्या दुचाकी वाहनांच्या पार्किंगमुळे रहिवासी व पायी चालणाऱ्या नागरिकांना अत्यंत गैरसोयीचा व अडचणींचा झालेला आहे. त्यामुळे नेरळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्यवर्ती कार्यालयाच्या परिसरातील दुचाकी पार्किंग करिता बंदी करून,मुख्य बाजारपेठेतून शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्यवर्ती शाखेकडे येणारा व कन्या शाळेकडे जाणारा बंद झालेला रस्ता रहदारीसाठी मोकळा करण्यात यावा अशी मागणी नेरळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख संदीप नारायण उत्तेकर यांनी नेरळ ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामसेवक यांना निवेदन देऊन रस्ता मोकळा करण्याची मागणी केलेली आहे.
*प्रतिक्रिया. ….*
*पूर्वीपासून रहदारीचा असलेला रस्ता रस्त्याच्या काँक्रिटीकरणांमध्ये पायऱ्या बनवून बंद पडलेला आहे. हा रस्ता दुचाकी व तीन चाकी वाहनांसाठी वापरण्यासाठी सोयीचा होता तो लवकरात लवकर प्रशासनाने मोकळा करावा. -संदीप नारायण उतेकर ,उपशहर प्रमुख (शिवसेना उबाठा)*