
संगमेश्वर : अर्चिता कोकाटे/ नावडी- संगमेश्वर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वांद्री येथे पर्यावरण पूरक स्वच्छता अभियान उपक्रम समाजसेवा मंडळ, परचुरी दुदमवाडी यांच्यावतीने राबविला गेला .
प्रा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साजन मोहिते यांनी समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष वसंत दुदम, सरपंच दीपक किंजळे, ग्रामीण वार्ताचे संपादक मुझ्झमिल काझी, महिला प्रमुख ममता दुदम आदी पदाधिकारी व मान्यवरांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान केला. तसेच मनोगत व्यक्त करताना स्वच्छता हा मानवी जीवनाचा मुख्य उद्देश विशद केला. तसेच समाजसेवा मंडळाच्या 30 सेवेकरी सदस्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.



दहा ते दोन या दुपारच्या वेळेत स्वच्छता अभियान संपन्न झाले. मंडळाच्या स्वच्छतेच्या आणि स्वार्थी सेवेला 31 वर्षे झाली असून मुझ्झमिल काजी यांनी प्रशंसा व्यक्त केली. यावेळी आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.आरोग्य केंद्रातर्फे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साजन मोहिते यांनी प्रमाणपत्र बहाल केले.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*