खेडमध्ये पूरस्थिती ओसरली नगरपरिषदेने साफसफाई चे काम युद्ध पातळीवर सुरू….

Spread the love

खेड  : खेड शहरात गुरुवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले होते. मात्र, आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असून पूरस्थिती पूर्णतः ओसरली आहे. शहरातील जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.
     

नगरपरिषदेकडून सकाळपासूनच युद्धपातळीवर स्वच्छतेची कामे हाती घेण्यात आली आहेत. रस्त्यांवरील चिखल हटवणे, सांडपाण्याची निचरा व्यवस्था सुरळीत करणे, यासह विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत.  स्थानिक प्रशासन नुकसानीचा आढावा घेत असून गरजूंना मदत पुरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page