
नेरळ- सुमित क्षीरसागर
नेरळ हिंदू स्मशानभूमी परिसरात कोंबड्याचे मांस टाकणाऱ्यावर लवकरात लवकर कारवाई करून हा परिसर स्वच्छ करण्यात यावा म्हणून आता नेरळ वासीयांनकडून नेरळ ग्रामपंचायतीला प्रसार माध्यमातून इशारा देण्यात आला आहे.तर पाच दिवसात यावर कुठलीही ठोस कारवाई झाली नाही तर नेरळकर म्हणून ग्रामपंचायती विरोधात आंदोलन करण्यात येल असा इशाराही देण्यात आला, तर हा परिसर एक नेरळकर म्हणून स्वतः रस्त्यावर उतरवून हा परिसर स्वच्छ करण्यात येल असेही सांगण्यात आलं.
रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत म्हणून कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीचे नाव पहिल्या स्थानावर येते,मग ते आर्थिकदृष्ट्या असो की राजकीय..परंतु याच ग्रामपंचायतीच्या कारभारावर सध्या नेरळकारांनी नाराजी व्यक्त केली.एक ना अनेक समस्या नागरिकांना भेडसावत असताना याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.परंतु याही पलीकडे…

गेली वर्षेभर नेरळ हिंदू स्मशानभूमी परिसरात कोंबड्याचे मांस आणि येथे कुत्रे मारून टाकले जात असल्याने या परिसरात दुर्गंधी पसरली आहे.येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना येथून प्रवास करताना नको होतं आहे तर परिसरात राहत असलेले नागरिक ही वेगवेगळ्या आजाराला बळी पडत आहेत.पवित्र असा हा परिसर या दुर्गंधीने शापित झाल्याचे दिसत आहे.

वेळोवेळी प्रसार माध्यमातून समस्यां मांडून ग्रामपंचायतीचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न देखील झाला,परंतु नाही येथील ग्रामपंचायत प्रशासनाला जाग आली की येथील लोक प्रतिनिधीना.आज सकाळी या स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार होत असतानाच या परिसरातील दुर्गंधीने डोके वर काढल्याने येथे जमलेल्या नागरीकांच्या नाकावर रुमाल ठेण्याची वेळ आली होती.

सुरुवातीला बाहेरील नागरिकांनी देखील यावर शहराची लाज बाहेर काढल्यारखे केले.परंतु हे कुठे तरी थांबले पाहिजे म्हणून एक जागरूक नेरळकर म्हणून आणि असाह्य झालेला नेरळकर म्हणून नेरळ ग्रामपंचायतीने हा परिसर पाच दिवसात स्वच्छ करावा तसेच येथे मातीचा भराव टाकून झाडांची लागवड करून हा परिसर गार्डन सारखा करावा जेने करून या परिसरात पुन्हा कचरा किंवा अन्य घाण टाकण्याचा कोणीही प्रयत्न करणार नाही तर येथे परिसरात घाण टाकणाऱ्यावर ठोस कारवाई करावी म्हणून सांगण्यात आलं.

असे झाले नाही तर एक नेरळकर म्हणून ग्रामपंचायती विरोधात आंदोलन करण्यात येल असा इशारा ही देण्यात आला तर एक नेरळकर नागरिक म्हणून स्वतः रस्त्यावर उतरून हा परिसर स्वच्छ करण्यात येल असेही सांगण्यात आलं..