गुहागर नगर पंचायतीमधील शहर विकास आघाडी, राष्ट्रवादी व भाजपच्या नगरसेविका रत्नागिरी येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या भेटीला गेल्याने शहरात राजकीय भूकंप होण्याची जोरदार चर्चा
गुहागर : गुहागर नगर पंचायतीचा पाच वर्षाचा कार्यकाळ दोन महिन्यांनी संपत असताना गुहागर नगर पंचायतीमधील शहर विकास आघाडी, राष्ट्रवादी व भाजपच्या नगरसेविका रत्नागिरी येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या भेटीला गेल्याने शहरात राजकीय भूकंप होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
बाळासाहेबांची शिवसेना गटाचे तालुकाप्रमुख दीपक कानगुटकर यांच्या उपस्थितीत ही सदिच्छा भेट मंगळवारी रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात घडवून आणण्यात आली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या भेटीनंतर गुहागर तालुक्यातील ठाकरे गटातील पदाधिकार्यांचे पक्ष प्रवेश यांच्यामुळे झाला ते किरण उर्फ भैय्या सामंत यांचीही भेट घेवून त्यांनाही पुष्पगुच्छ देण्यात आले. त्यामुळे गुहागर शहरात राजकीय भूकंप होणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे गुहागरात शिंदे गटाचा जोर वाढणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांना सदिच्छा भेट घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्ष नगरसेविका स्नेहा भागडे, नगरसेविका मनाली सांगळे, बांधकाम सभापती वैशाली मालप, स्नेहा सांगळे, भाजपच्या भाग्यलक्ष्मी कानडे, मृणाल गोयथळे यांची उपस्थिती होती.
गुहागर नगरपंचायतीच्या कार्यकाळासाठी अवघे दोन महिने शिल्लक आहेत. अशा वेळी गुहागरच्या विकासासाठी कोट्यावधींचा निधी आणण्यासाठी ही भेट असल्याचे बोलले जात आहे. तसेच पालकमंत्र्यांनी काही दिवसापूर्वी नगर पंचायतीला एक कोटी रुपयंचा निधी दिला आहे. त्याबद्दल हे नरसेवक आभार मानण्यासाठी गेल्याचे बोलले जाते. तर मग त्यांनी नगराध्यक्ष किंवा इतर नगरसेवकांना का नाही सोबत नेले असा सवाल उपस्थित केला जात आहे.
जाहिरात :