संगमेश्वर मधील रामपेठ बाजारपेठेमध्ये भरले पाणी दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक त्रस्त…

Spread the love

*दिनेश आंब्रे/ संगमेश्वर प्रतिनिधी-* गेल्या दोन दिवस होत असलेल्या पावसामुळे शास्त्री नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर मध्ये शास्त्री नदीच्या लगत असलेल्या रामपेठ मध्ये पाणी भरले आहे. वर बाजार पेठ मधील रस्त्यावरती ही पाणी आलेले आहे.

लोकांच्या दुकानांमध्ये पाणी गेल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत. संगमेश्वर चे पोलीस पाटील अंगराज कोळवणकर, संगमेश्वर चे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण, कर्मचारी राजू शेरे, आकाश शेटे यांनी जातीनिशी जागेवर जाऊन नागरिकांना सतर्क राहण्याच्या वाहन केले आहे. ग्रामपंचायत वार्ड मधील सदस्य व ग्रामपंचायत बॉडी नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन केले आहे.

रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धामणीतील श्रद्धा हा़ॅटेलला पुराच्या पाण्याचा वेढा

रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धामणी, संगमेश्वर परिसरात पूर स्थिती निर्माण झाली असून व्यापारी वर्ग चिंतेत आहे. श्रद्धा हाॅटेलला पाणी भरल्याने ला़ॅजसह हाॅटेलचे खूप नुकसान झाले आहे.

माती नद्यांमधून गेल्यामुळें नद्या पूर्ण भरल्या असल्याची चर्चा जाणकार करत असून शासनाने यावर उपाय करणे गरजेचे आहे.  आज अतिवृष्टीमुळे आनंदी शिक्षणाचा प्रवेशोत्सव कसा होणार यासाठी पालक व शिक्षक चिंतेत आहेत.

संगमेश्वर मधील श्रद्धा हॉटेल परिसरामध्ये हे रात्री पाणी भरले होते तिथेही प्रचंड नुकसान झाल्याचे आमच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीवरून कळत आहे. संगमेश्वर परिसरामध्ये जोरदार पाऊस झाल्याने शास्त्री व सोणवी नदीच्या पाणीपतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आलेले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page