क्लस्टर योजनेविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी दिवेकर नागरिकांची प्रचंड गर्दी
दिवा (प्रतिनिधी) – क्लस्टर योजनेत आपण विकासकाच्यामध्ये न जाता विकासकाला बाजूला सारुन आपणच विकासक व्हायचं.आपणंच आपली सोसायटी तयार करायची आणि आम्हीच विकासक आहोत. आम्हीच. आमचा स्वयंपुर्नविकास करु शकतो.यासाठी दिवेकर नागरिकांनी स्वयंपुनर्विकासाला प्राधान्य द्यायचे असे प्रतिपादन ठाणे मतदाता जागरण अभियानाचे पदाधिकारी श्री अनिल शालीग्राम यांनी केले.ते दिव्यात भारतीय जनता पार्टी आणि जागा हो दिवेकर आयोजित क्लस्टर योजना किती फायद्याची किती तोट्याची ? दिवेकरांना क्लस्टर योजना संजीवनी ठरेल का ? या मार्गदर्शन चर्चासत्रात बोलत होते.
काल दिव्यातील नागनाथ मंदिर येथे क्लस्टर योजना किती फायद्याची किती तोट्याची याविषयी चर्चा सत्र पार पडले.या चर्चा सत्रात दिव्यातील 10 सामाजिक संघटनाही सहभागी झाल्या होत्या.त्यामुळे नागरिकांनी नेमकं क्लस्टर काय आहे.याविषयी ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिव्यातील प्रतिष्ठीत नागरिक श्री गोवर्धन भगत उपस्थित होते.तसेच भाजपा दिवा मंडळ अध्यक्ष श्री रोहीदास मुंडे,जागा हो दिवेकरचे प्रणेते श्री विजय भोईर,भाजपा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री नरेश पवार,सामाजिक कार्यकर्त्या सौ.रेश्माताई पवार,ओबीसी सेलचे दिवा अध्यक्ष श्री रोशन भगत,सौ.सपना भगत,महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.ज्योतीताई पाटील,ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या सौ.चेतना दिक्षित आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना पुढे शालीग्राम म्हणाले की, क्लस्टर योजना ही दिवेकरांसाठी नक्कीच व्हावी.याला कोणाचा विरोध नाही,परंतु ती कशी राबविली जाणार याविषयी नागरिकांना सांगितले जात नाही.सद्य़ा या परिसरात सर्वे केला जात आहे.त्या सर्व्हेची साधी पावतीही दिली जात नाही.त्यामुळे येथील नागरिक आजही संभ्रमीत आहेत.आम्ही क्लस्टर या विषयावर अनेक वर्षे काम केलेलं आहे.त्याच्यातून क्लस्टर योजना केव्हा फायद्याची ठरु शकेल आणि केव्हा ती धोकादायक आणि अडचणीची रहिवाश्यांसाठी ठरु शकेल हे आमच्या लक्षात आले आहे.पहीला मुद्दा म्हणजे क्लस्टरचा आपला अभ्यास करताना आमच्या अश्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये खिडकी आहे.एक विंडो आहे.ती विंडो कुठली आहे तर ती म्हणजे क्लस्टर अंतर्गत स्वयंपुर्नविकास.ही जी विंडो आहे,ही विंडो नागरिकांच्या फायद्याची आहे आणि नागरिकांनी आपल्या घराचे प्रश्न वेगळ्या अंगाने आपल्याला धसास नेता येतील
स्वयंपुर्नर्विकास विकास संकल्पना
क्लस्टर योजना लागू झाल्यास नागरिकांनी सेल्फे प्री डेव्हलपमेंट राबविली पाहीजे. सेल्फ प्री डेव्हलपमेंट म्हणजे स्वयंपुर्नविकासाची संकल्पना काय आहे.त्यासाठी नागरिकांची तळागाळातून एक साखळी ही बांधणे आवश्यक आहे. ती जर आपण बांधली नाही.तर वरती किती जरी सेल्फ प्री डेव्हलपमेंटचा विचार केला तरी देखील आपण त्या अंगाने जावू शकणार नाही.त्यामुळे सेल्फ प्री डेव्हलपमेंटमध्ये नागरिकांनी सोसायट्या तयार केल्या पाहीजेत. तळागाळाला जावून काय नियम आहेत काय नाही.याविषयी जनजागृती केली पाहीजे तरच लोकांना समजू शकते.
आजच्या समाजामध्ये वावरत असताना वेगवेगळे राजकीय पक्ष असतात आणि त्यांना आपण प्रतिनिधी म्हणून आपण पाठविलेलं असतं. आपण नागरिक आहोत त्यामध्ये देखील आपली विविध राजकीय मत आपली असतात.तर ती असणं पण आवश्यक आहे.परंतु आमचा असा अभ्यास आहे ती,जरी आपली वेगवेगळी मत असली तरी आपण तळागाळाला बेसिक लेव्हलला सर्व प्रकारच्या विचारांनी बांधलो गेलेलो असलो तरी आपण एकत्र राहणं आवश्यक आहे.आणि एक सामाजिक साखळी आपली बांधणं आवश्यक आहे.कारण आपण जे पाठविलेले जे आपले राजकीय प्रतिनिधी असतील किंवा निवडून दिलेले लोकं असतील तर ते आपलेच आहेत.आणि आपल्याला त्यांच्याकडूनही पाठिंबा पाहीजे.परंतु आपण जर का केवळ त्यांच्यावरच अवलंबून राहीलो.तर आपलं काम भागणार नाही.त्यामुळे आपली खालची मजबूत साखळी असेल तरच हे सगळे प्रश्न धसास लावू शकतात.
कोणीतरी क्लस्टर आणतंय म्हणून नागरिकांनी मेंढरासारखं पाठी जावू नये –डाॅ. चेतना दिक्षित
क्लस्टर आमच्यावर लागू झालं तर सर्वात पहिले आम्हाला काय मिळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. प्रत्येक नागरिकांनी सर्वप्रथम जागृत होण्याचे गरजेचे आहे.प्रश्न आपल्या घराचा आहे.दिवा विभागात पत्येकाच्या मालकीचे घर आहे. अश्या प्रत्येकांनी डोळे उघडे ठेवून क्लस्टर समजून घेणं गरजेचे आहे.जो समजून घेईल तोच फायद्यात राहील आणि जो समजून घेणार नाही तो फक्त कोणीतरी क्लस्टर आणतंय म्हणून मेंढरासारखं मागे जाईल.क्लस्टर हे तुमचं घर आहे.तुम्ही येथे घर घेण्यासाठी कुठून पैसा आणला,कसे दागदागिणे विकले ते लक्षात असूंद्या.तुम्ही मोठं मोठे अधिकृत घरे नाही घेवू शकलात,तुम्हाला स्वस्त घर भेटलं म्हणून तुम्ही घेतलात ते घर कायमस्वरुपी टिकेल की नाही याबद्दल माहीती घ्या.