
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीए कडून मुंबईत मेट्रो जाळे विणण्याचे काम जोरात सुरू आहे.
नवी मुंबई- नवी मुंबईत सिडको उभारणार नवा मेट्रो प्रकल्प
नवी मुंबई क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम व्हावी यासाठी सिडकोकडून सतत प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता चार मेट्रो (Metro) मार्गांची आखणी केली असून यातील बेलापूर ते पेंधर हा मेट्रो मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या मार्गाचा लवकरच शुभारंभ होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
नवीन मेट्रो प्रकल्प काय आहे?
सिडकोने आता आणखी एक नवीन मेट्रो मार्ग (Metro) उभारण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. सिडकोचे संचालक डॉ संजय मुखर्जी यांनी राज्य शासनाकडे मानखूर्द ते नवी मुंबई विमानतळ दरम्यान मेट्रो मार्ग उभारण्याची जबाबदारी सिडकोला देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्याला आता शासनाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीए कडून मुंबईत मेट्रो जाळे विणण्याचे काम जोरात सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द या ११ किलोमीटर अंतराच्या मेट्रो (Metro) मार्गानंतर मानखुर्द ते वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ आणि बेलापूरपर्यंतच्या मेट्रो मार्गांची उभारणी सिडको करणार आहे.
मानखुर्द ते बेलापूर या दहा किलोमीटर मार्गांची उभारणी सिडको कडून करण्यात येणार आहे.