विद्यार्थिनीची नासा साठी निवड, शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा!गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान!…

Spread the love

*संगमेश्वर-* शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या नासाच्या परीक्षेत जि.प.आदर्श शाळा कोंड असुर्डे  या शाळेतील  विद्यार्थीनी शुभ्रा संतोष शेट्ये ही उत्तीर्ण होऊन तिची नासा दौर्यासाठी निवड झाली आहे.

शुभ्राने  तिचे पालक व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सरावाने अभ्यास केला. व यश मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. तसेच जिल्हा स्तरावर खोखो खेळासाठी निवड झालेली या शाळेतील विद्यार्थीनी मुद्रा संदिप रहाटे यांना शालेय शैक्षणिक वस्तू भेट देऊन  , संगमेश्वरचा गणेश फरसाण मार्ट  उद्योजक संतोष रहाटे  यांच्याकडून गौरविण्यात आले.  यावेळी पत्रकार व सामाजिक कार्यरकर्ते यांनी मनोगत व्यक्त करून  पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

या वेळी  मुख्याध्यापक सुनिल करंडे, शिक्षिका पवार व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
मुख्याध्यापक सुनिल करंडे यांनी आभार मानले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page