गुहागर- 2024 मध्ये गुहागरमध्ये भाजपचा आमदार असेलो अनुधान्य वाटप झाले. हे केवळ या विकासाचा पत्ताच नाही. केवळ वेगवेगळी सोंगे घेऊन हे भूत गेली १० वर्षे तुमच्या
मानगुटीवर बसले आहे, अशी टिका करून गुहागरला लागलेले हे एक राजकीय ग्रहण २०२४ ला सोडवा, असे आवाहन भाजपा प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांनी आबलोली येथे झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केले.
आज आमच्या पक्षाचे नेते १६ तास काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस,अजित पवार हे नेते रात्रंदिवस राज्यातील जनतेसाठी कामे करत आहेत. आज आबलोली येथील नम्रता निमणुकर यांच्या पक्ष प्रवेशाने कोकणातील राजकीय भूकंपाला सुरुवात झाली आहे. असे भूकंप आणखी होणार आहेत. रामदास राणे यांच्याकडे युट्युबचे व्हीडीओ आहेत ते त्यांनी योग्यवेळी बाहेर काढून येथील सत्ताधाऱ्यांचा बुरखा फाडावा, असेही चित्राताई यांनी सूचित केले.
आमची संपूर्ण ताकद महिलांच्या पाठीशी..
संतोष जैतापकर यांचे काम उत्तम त्यांचे बळ वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत
आमची संपूर्ण ताकद या महिलांच्या पाठीशी असून कुणालाही घाबरून जाऊ नका, असे आवाहन वाघ यांनी पक्षप्रवेश केलेल्या महिलांना केले. संतोषदादा जैतापकर यांचे काम या तालुक्यात उत्तम असून त्यांचे बळ वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत,असेही त्यांनी शेवटी सांगितले.गुहागर तालुक्यातील आबलोली येथे भाजपचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी सेलचा कार्यकर्ता संवाद मेळावा व जाहीर पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम शनिवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून चित्राताई वाघ होत्या व्यासपीठावर चिपळूणच्या माजी नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे, सौ. वर्षा भोसले, भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आबलोलीच्या नम्रता निमुणकर यांच्यासह गुहागर मतदारसंघ हा कधीच शिवसेनेचा किंवा राष्ट्रवादीचा नव्हता.
2024 मध्ये विधानसभेवर भाजपच्या झेंडा फडकेल..
गेली ४० वर्षे या मतदार संघात भाजपची सत्ता होती.आणि आता ती वेळ आली असून २०२४ मध्ये गुहागरमध्ये भाजपचा झेंडा फडकेल. गुहागरचा पुढचा आमदार हा कोण असेल हे आताच सांगता येणार नाही. भाजप हा पक्ष मोठा असून तो शिस्तीचा आहे. त्यामुळे कुणीही उमेदवार भाजपचा असला तरी आम्ही त्याला निवडून आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणावर बोलताना त्या म्हणाल्या, आम्ही तकलादू नाही तर टिकणारे असे कायमस्वरुपी आरक्षण मराठा समाजाला देणार आहोत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस मराठा आरक्षण देण्यास कटिबद्ध..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे आरक्षण देण्यासाठी कटिबध्द आहेत आणि ते नक्की या समाजाला न्याय देतील अशी ग्वाही त्यांनी दिली.ओबीसी सेलच्या महिला प्रतिनिधी, गुहागर धनगरवाड्याकडे जाणारा साधा रस्तातालुका भाजपा अध्यक्ष निलेश सुर्वे, रामदास राणे, बाबा भालेकर, यशवंत बाईत, परिमल भोसले, लक्ष्मण शिगवण सचिन ओक, बंडू थरवळ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते नाही.
आमदार भास्कर जाधव यानी गुहागरमध्ये जातीजातीमध्ये भांडणे लावली. घरांमध्ये वाद लावले. हा माणूस नाच्याचे काम चांगले करतो. अशा माणसाला त्यांची जागा येथील जनतेने दाखवावी.
भ्रष्टाचाराचे तंत्रज्ञाने घेऊन सॉंग घेण्याचे काम..
यावेळी चित्राताई वाघ म्हणाल्या,
भ्रष्टाचाराचे तुणतुणे घेऊन सोंग घेण्याचे काम येथील राजकीय नेतृत्वाने केले आहे. मंत्री असूनही गुहागर मतदारसंघाचे विकास झालेला नाही. एका गावातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे सर्वसामान्य महिलांना उज्ज्वला गैस योजना मिळाली. कोवीड काळात मोफत लस मिळाली म्हणून आपण सर्व जिवंत राहिलो आहोत. मोदींमुळे महिलांसाठी विविध योजना आल्या. जनधन खाते उघडण्यात आले.राज्यामध्ये एसटीमध्ये महिलांना ५० टक्के सवलत मिळाली त्यामुळे आज बिनधास्तपणे एकटी महिला एसटीने प्रवास करत आहे. स्वच्छतागृहे उभारल्यामुळे विशेष करून महिलांची गैरसोय दूर झाली. आज घरोघरी स्वच्छतागृह झालेली आहेत. आजपर्यंत महिलांचा फक्त मतदानासाठी वापर केला गेला माल, केंद्रातील भाजप सरकारमुळे आज महिलांसाठी नवनवीन योजना राबविल्या जात आहेत. कोवीड काळात मोफत अन्नधान्य वाटप झाले हे केवळ या सरकारमुळे शक्य झाले.