
*चिपळूण :* शहरालगतच्या खेर्डी गावातील क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट, स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट, पर्सनल ट्रेनर रेपस इंडिया तसेच न्यूट्रो जेनीमिक्स कौन्सिलर सौ. संध्या संतोष दाभोळकर यांनी नुकतेच जगप्रसिद्ध बीएमडब्ल्यू बर्लिन वर्ल्ड मॅरेथॉन (४२ कि.मी.) या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
या स्पर्धेसाठी भारतातून केवळ दोन महिला धावपटूंना संधी मिळाली होती, त्यामध्ये संध्या दाभोळकर यांची निवड होणे ही चिपळूणसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या त्या चिपळूणमधील पहिल्या व एकमेव महिला धावपटू ठरल्या आहेत.
खेर्डी येथील सुप्रसिद्ध डॉक्टर संतोष दाभोळकर यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत. गेली सलग बारा वर्षे त्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये इंटरनॅशनल रनर म्हणून धावत आहेत. टाटा अल्ट्रा इंटरनॅशनल, टीसीएस बंगलोर (५ वेळा), एअरटेल दिल्ली रन (३ वेळा), वाशी, ठाणे, सातारा हिल मॅरेथॉन यांसह देशातील अनेक नामवंत शर्यतींमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे.
त्यांची कारकीर्द अनेक मानाच्या यशांनी उजळलेली आहे. सचिन तेंडुलकर आयडीबीआय मॅरेथॉनच्या त्या सलग तीन वर्षे ब्रँड अॅम्बेसिडर होत्या. नायकी ब्रँडच्या अॅम्बेसिडर म्हणूनही त्यांनी काम केले. कोकण बीच मॅरेथॉनमध्ये त्यांनी सलग चार वेळा विजेतेपद मिळवले. कुंडलिका रिव्हर मॅरेथॉनमध्ये दोन वर्षे विजेतेपद, कृष्णा डायमंड वूमन मॅरेथॉन (मुंबई) या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजय आणि नेव्ही मॅरेथॉन मुंबईत सात वर्षे सलग सहभाग हे त्यांच्या कामगिरीचे विशेष ठळक पैलू आहेत.
आजवर दोनशेहून अधिक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन विक्रम केलेल्या संध्या दाभोळकर यांची निवड बर्लिनसाठी होणे अपेक्षितच होते. २१ सप्टेंबर रोजी जर्मनीतील बर्लिन येथे ही स्पर्धा पार पडली. नुकत्याच त्या चिपळूणमध्ये दाखल झाल्या असून त्यांच्या या अभूतपूर्व यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*

