
चिपळूण: शहरातील मुंबई-गोवा महामार्गावर डीबीजे महाविद्यालयासमोर रविवारी (दि. 21) सकाळच्या वेळेत गुंड प्रवृत्तीच्या पाच-सहा जणांच्या युवकांच्या टोळक्याने दोघांना किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीनंतर चांगलेच बदडून काढले. या दोन तरुणांना अन्य पाच ते सहाजणांनी रस्त्यावर आडवे पाडून एक प्रकारे अमानुष मारहाण केल्याच्या कृत्याचा तीव्र संताप शहरातून व्यक्त होत असून जिल्ह्यात प्रतिबंधात्मक व मनाई आदेश असताना देखील या टोळक्याने केलेल्या मारहाणीविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
याबाबत समाजमाध्यमावर मारहाण व बाचाबाचीचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर शहरातून या गुंड प्रवृत्तीच्या विरोधात प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली. महामार्गावरच दोघा तरुणांना अन्य काहीजण अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून उठाबश्या काढायला लावण्यास सांगत होते. सुरुवातीला झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान वर्दळीच्या महामार्गावर हाणामारीत झाले. वाद आणि मारामारीचे कारण महाविद्यालयातील कॅन्टीनमधून सुरू झाले. त्या ठिकाणी बसण्याच्या जागेवर संबंधितांमध्ये आपापसांत वाद झाला. तेथून हा वाद थेट महामार्गावर आला आणि दोन युवकांना अन्य पाच-सहा जणांनी घेरून अश्लील भाषा उच्चारत दादागिरी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यापैकी काहींनी बाचाबाची सुरू असताना थेट दोन युवकांच्या अंगावर जात हाणामारीला सुरुवात केली.
या हाणामारीत पळापळ सुरू असतानाच दोन्ही युवकांना रस्त्यावर आडवे पाडून बदडण्यात आले. या व्हिडीओवरून नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. जिल्ह्यात प्रशासनाने प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू केला असताना देखील कायद्याचा धाक नसलेल्या प्रवृत्तीच्या युवकांनी महामार्गावरच हाणामारी करण्याच्या प्रकाराबाबत चीड व्यक्त होत आहे.
दरम्यान, या सर्व हाणामारीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होताच पोलिसांनी संबंधित तरुणांना तातडीने पोलिस ठाण्यात आणले. त्या पाठोपाठ त्यांचे पालकही आले. अखेर मुले अज्ञान असल्याचा फायदा घेत संबंधितांना केवळ कठोर भाषेत समज देऊन सोडून देण्यात आले. मात्र, या बाबत प्रत्यक्षात या विषयावरून सुरू असलेल्या चर्चेतून माहिती घेतली असता, त्यापैकी अज्ञान म्हणून असलेला एक युवक एका राजकीय माजी लोकप्रतिनिधीच्या कुटुंबातील असून यापूर्वी संबंधित युवकाविरोधात नागरिकांमध्ये त्याच्या उद्दाम वर्तनामुळे तक्रारीचा सूर ऐकिवात होता. तसेच तो युवक आपल्या ताब्यातील बुलेट दुचाकी घेऊन बेफाम वेगाने बाजारपेठेत नेहमीच घिरट्या घालण्याचे काम करीत असे. तसेच त्याला कोणी हटकल्यावर तो उद्दामपणे दादागिरीची भाषा करतो. मात्र, त्याच्यावर तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने कायद्याचा धाक न उरल्याने अखेर अज्ञात असल्याचा फायदा घेत महामार्गावर दोन युवकांना मारहाण करून दहशत निर्माण केल्याचा प्रयत्न केल्याची तीव्र भावना शहरातून व्यक्त होत आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥⬜️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा
आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..
“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…

