रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय वातावरण गरम…
चिपळूण : काँग्रेसच्या चिपळूणमधील काही पदाधिकाऱ्यानी केलेल्या पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष श्री. प्रशांत यादव यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठविला असल्याचे खात्रीलायक वृत्त प्राप्त झाले आहे. तशी माहिती त्यांच्या निकटच्या सूत्रांनी दिली आहे. याबाबत श्री. यादव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
काँग्रेसच्या चिपळूणमधील काही पदाधिकाऱ्यानी केलेल्या पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष श्री. प्रशांत यादव यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठविला असल्याचे खात्रीलायक वृत्त प्राप्त झाले आहे. तशी माहिती त्यांच्या निकटच्या सूत्रांनी दिली आहे. याबाबत श्री. यादव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.