
शिवजयंती भव्य दिव्य साजरी होणार!
चिपळूण : चिपळूण तालुका मराठा समाजातर्फे शिवजयंती महोत्सव रविवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी हॉटेल अतिथी समोरील पटांगणात साजरी केली जाणार आहे. ही शिवजयंती भव्य दिव्य असेल, असा विश्वास उद्योजक प्रकाश देशमुख व सतीश मोरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेद्वारे व्यक्त केला.
यावेळी प्रसिद्ध आर्किटेक दिलीप देसाई, संतोष सावंतदेसाई, सचिन नलावडे, प्रसाद शिर्के, सुनील चव्हाण, अनंत शिर्के, उदय चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले की यावर्षी चिपळूण तालुक्याची एकच शिवजयंती साजरी करण्याचे नियोजन होते. परंतु, अन्य संस्थांनी अगोदरच नियोजन केल्याने यावर्षी एकत्र शिवजयंती साजरी होत नसली तरी पुढील वर्षी यावर्षी पेक्षा भव्य दिव्य शिवजयंती एकत्रित साजरी करण्याचे आमचे नियोजन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तर यावर्षीच्या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत माहिती देताना ते पुढे म्हणाले की, सकाळी १० वाजता शिवपूजन, सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजता भव्य दुचाकी रॅली, शहरातील विविध शिवजयंती कार्यक्रमास भेट दिली जाणार आहे. सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत चिपळूण तालुका मराठा महिला मंडळतर्फे हळदीकुंकू समारंभ तर महिलांसाठी होम मिनिस्टर विशेष कार्यक्रम होणार असून यावेळी विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते पैठणी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत पारंपारिक ढोल वादन तर सायंकाळी ७.३० ते रात्री १० वाजेपर्यंत पंचम प्रस्तुत मराठी वाद्यवृंद गर्जा महाराष्ट्र माझा कार्यक्रम होईल, अशी माहिती यावेळी दिली.
या शिवजयंतीला आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, उपजिल्हाप्रमुख प्रताप शिंदे, काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, उद्योजक निलेश चव्हाण, उद्योजक प्रकाश देशमुख, उद्योजक शशांक पवार, उद्योजक केतन पवार,वउद्योजक सतीश मोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.