
*चिपळूण, (प्रतिनिधी):* चिपळूण पोलीस ठाणे हद्दीतील छात्रावासात राहणाऱ्या नागालँड व मणिपूर येथील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने आज (९ ऑगस्ट) चिपळूण पोलीस ठाण्यात हजेरी लावून पोलिसांना राख्या बांधून सणाचा आनंद वाटला.
या विद्यार्थिनींनी पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजेंद्रकुमार राजमाने, पोलीस निरीक्षक श्री. फुलचंद मेंगडे तसेच उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदारांना राख्या बांधल्या. यावेळी त्यांनी मराठीतील श्री गणेश आगमन गीतही सादर केली.
या उपक्रमाचे कौतुक करत पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या आणि सांस्कृतिक जडणघडीत त्यांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
