
लखनऊ : मालेगाव बॉम्बस्फोट घटनेत निष्पाप हिंदूंना अडकवून राष्ट्रप्रेमी नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. दहशतवादाबाबत त्यांचे मवाळ धोरण, जातीच्या आधारावर समाजचे विभाजन करण्याची त्यांची रणनीती देशासाठी घातक आहे, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्र योगी आदित्यनाथ यांनी आज मेरठ येथे एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर टीका केली आहे. सपा आणि काँग्रेसचे राजकारण हे केवळ जातीयवाद, दंगली आणि माफियांची पूजा करण्यापुरते मर्यादित आहे. योगी आदित्यनाथ यांनी मालेगाव बॉम्ब प्रकणावरून सपा आणि काँग्रेसवर टीका केली आहे.
निकालावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
योगी आदित्यनाथ म्हणाले, काँग्रेस आणि समाजवादी पक्षांसारखे पक्ष राष्ट्रप्रेमी लोकांना कायमच अडकवण्याचा कट रचतात. मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात निष्पाप हिंदूंना गोवण्यात आले. तर दहशतवाद्यांना वाचवण्यात आले. आज तेच लोक देशातील संविधानिक यंत्रणांवर प्रश्न उपस्थित करत आहेत.

माझ्यावर नरेंद्र मोदी, मोहन भागवत, योगी आदित्यनाथ, सुदर्शन, इंद्रेश, रामजी माधव यांची नावे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. मी जर यांचे नाव घेतले तर ते मला मारणार नाहीत असे ते मला सांगत होते. माझ्याकडून त्यांची नावे वदवून घेण्यासाठी मला त्रास दिला जात होता. मला ते खोटे बोलण्यास सांगत होते, असा आरोप भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा यांनी केला आहे. माझा तुरुंगात माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला गेला. कठोर छळ करून त्यांना हवे तसे त्यांनी मला बोलायला लावण्याचा प्रयत्न केला. मात्र मी खोटे बोलले नाही, असेही त्यांनी सांगितले.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर