
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप झाला असून या अधिवेशनात १६ महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यात आली आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, राज्यात सध्या सरासरीपेक्षा ९३ टक्के अधिक पाऊस पडला आहे. अनेक भागांत धरणांचा पाणीसाठा समाधानकारक असून यंदाचा खरिप हंगाम चांगला जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काही भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तत्काळ मदतीचे वाटप सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

याशिवाय, दिव्यांग नागरिकांना दरमहा ₹२५०० आर्थिक मदत देण्याच्या निर्णयाचीही त्यांनी अधिवेशनात माहिती दिली.
तसेच, महाराष्ट्रातील ११ किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला असे मिळून एकूण १२ किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा यादीत करण्यात आल्याची आनंददायक माहितीही त्यांनी यावेळी दिली.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर