मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट…

Spread the love


ठाणे ; प्रतिनिधी (निलेश घाग) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मध्यरात्री दिल्लीत दाखल झालेले. आज त्यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेद्र मोदी यांची भेट घेतली. यानतर ते अमित शहांंची देखील भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री दिल्लीत पोहचलेले आहेत.दरम्यान, पंतप्रधानांच्या या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधताना, राज्यातील पायाभूत सुविधांबाबत चर्चा करण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. धारावी पुनर्वसन प्रकल्प तसेच राज्यातील इतर प्रकल्पांवरही मोदींशी चर्चा केली. या भेटीत मोदींसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. केवळ विकासकामांवर चर्चा झाली, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, वडील, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी व मुलगाही हजर होते.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page