अयोध्येत भव्य दिव्य महाराष्ट्र भवन उभारणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Spread the love

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदेंचा हा पहिलाच अयोध्या दौरा आहे. दरम्यान, अयोध्येत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. त्याचबरोबर एक मोठी घोषणा देखील केली.अयोध्येत भव्य दिव्य महाराष्ट्र भवन उभारणार, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी केली. उत्तर भारतीय आणि महाराष्ट्र काही वेगळा नाही, असं विधानही त्यांनी केलं. याआधी देखील एका कार्यक्रमात बोलताना उत्तर प्रदेशातील अयोध्येत लवकरच महाराष्ट्र भवन बांधले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page