मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवशीय आयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री विमानाने आयोध्येसाठी रवाना होणार आहेत. राज्यातून हजारो शिवसैनिक, आमदार, खासदार, मंत्री यांच्यासह मुख्यमंत्री रामलल्लाच्या दर्शनाला आयोध्येत जात आहेत. शिवसेना नाव आणि धनुष्यबान चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांसह आयोध्या दौऱ्यावर येत आहेत… या दौऱ्याची शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आलीय. मुख्यमंत्री रविवारी रामलल्ला, हनुमान गढी दर्शन पूजन, मंदिराच्या बांधकाम जागेची पाहणी, शरयू आरती आणि लक्ष्मण किल्ला मंदिरात संतांचे आशीर्वाद घेणार आहेत. मुख्यमंत्री यांच्यासोबतच राज्यातून ठाणे आणि नाशिकमधून दोन ट्रेन्सदेखील रवाना झाल्या आहेत… या दोनही ट्रेन्समधून कार्यकर्ते आयोध्येत पोहचणार आहेत. आयोध्येत धनुष्यबान असलेले अनेक बॅनर्स लागले असून आजूनही बॅनर्स लावण्याच काम शिवसैनिकांकडून सुरू आहे… 3 हजार पेक्षा जास्त शिवसैनिक आयोध्येत येणार असल्यानं त्यांच्या रहाण्यासाठी धर्मशाळा आणि हॉटेल्सचं बुकिंग करण्यात आलयं.