वैद्यकीय मदतीसाठी ॲप डाऊनलोड करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.etech.cmrelief
याचवेळी दुर्धर व गंभीर आजारांवर यशस्वी मात केलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा आनंद मेळा आयोजित करण्यात आला होता. तसेच वैद्यकीय मदत मार्गदर्शक ग्रंथाच्या ५व्या आवृत्ती आणि #रोखठोक या पुस्तकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
राज्यातील प्रत्येक नागरिकाला सर्व शासकीय रुग्णालयांत मोफत तपासणी आणि उपचार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेची अंमलबजावणी आजपासून करण्यात येत आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.
यावेळी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.