मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी आज दरे (ता. महाबळेश्वर) येथील निवासस्थानी आयोजित बैठकीत सातारा जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला.

Spread the love

सातारा ; कांदाटी खोऱ्यातील तरुण रोजगारासाठी मुंबई, ठाणे व पुणे सारख्या शहराकडे जात आहेत. त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी व स्थलांतरित तरुणांना पुन्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कांदाटी खोऱ्यातील पर्यटन विकास कामांबरोबर येथील शेतकऱ्यांना वनौषधी, बांबू लागवड करण्यावर प्रोत्साहित करुन नवीन उत्पन्नाचे साधन तयार करण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

सातारा जिल्ह्यातील सर्व धरणांतील पाणी साठ्याची माहिती घेऊन मुख्यमंत्री श्री. शिदे यांनी कोयना जलाशयातील कमी झालेला जलसाठा व जलाशयातील साठलेला गाळ उचलण्याची असलेली संधी पाहता #गाळमुक्तधरण योजनेंतर्गत गाळ उचलण्याच्या सूचना दिल्या. महाबळेश्वर येथील सोळशी धरणाचा सर्वेक्षण आराखडा जलदगतीने पूर्ण करण्याचेही निर्देश दिले.

महाबळेश्वर पाचगणी पर्यटन विकास आराखडा, प्रदूषण नियंत्रण, घाट विकास आराखडा, स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती, तापोळा विकास आराखडा, महाबळेश्वर येथील पार्किंग, कांदाटी खोरे विकास, प्रतापगड विकास योजना, बेल एअर रुग्णालयाच्या कामांसह विविध विषयांचा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आढावा घेतला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page