
जनशक्तीचा दबाव न्यूज | मुंबई | एप्रिल ११, २०२३.
महाराष्ट्रात २८ मे हा दिवस ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली.
२८ मे हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिवस दिवस आहे. याचं औचित्य साधून हा दिवस राज्य शासनातर्फे ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिवस’ म्हणून साजरा केला जाणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन जाहीर केलं. या निमित्ताने सरकराकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे.
स्वातंत्र्यवीर गौरव दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी ठेवला होता, जो सरकारने स्वीकारला आहे. याबद्दल तमाम सावरकरप्रेमींकडून उदय सामंत यांचे अभिनंदन होत आहे.