
देवरूख- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांनी संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक गावाला शनिवारी दिनांक २२ रोजी भेट दिली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची पाहणी करून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
बचत गटातील महिलांनी श्रमदान करून श्रीमती रानडे यांच्या उपस्थितीत विजय बंधाऱ्याची बांधणी केली. याबाबत बचत गटातील महिलांचे मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे यांनी विशेष कौतुक केले. आंबेड बुद्रुक ग्राम पंचायत कार्यालयाला भेट देऊन दिनांक १७ सप्टेंबर २०२५ पासून केलेल्या कामाची माहिती घेतली. ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती संजीवनी गवंडी यांनी गावात घेतलेल्या सर्व उपक्रमांची माहिती दिली. तसेच यावेळी सरपंच सुहास मायगडे, उपसरपंच शोएब भाटकर यांनी गावाच्या वतीने अभियानातील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून अभियान यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५/२६ मध्ये आंबेड बुद्रुक ग्रामपंचायातीने सहभाग घेतला आहे. गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, तंटामुक्त समिती अध्यक्ष अनिरुद्ध मोहिते, सर्व विभागाचे शासकीय अधिकारी, महिला बचत गट, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी यांच्या माध्यमातून गावात जनजागृती करण्याचे काम सुरु आहे. यावेळी उप मुख्यकार्यकारी अधिकारी श्री सागर पाटील, सामान्य प्रशासन मुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंग जाधव, बाल विकास प्रकल्प अधिकारी मल्लीनाथ कांबळे, गटविकास अधिकारी श्री आनंद लोकरे, सहाय्य्क गट विकास अधिकारी विनोदकुमार शिंदे, कृषी अधिकारी परेश सुर्वे, विस्तार अधिकारी जे. आर. पारशे,शंकर घुले, पंकज निकम, प्रणय भायनाक, उपाभियंता शिरीष गायकावाड, अभि कांबळे, केंद्र प्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षक, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, बचत गट, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर