
चेन्नई ,09 ऑगस्ट- दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार, सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलरवर रजनीकांत यांच्या चाहत्यांच्या उड्या पडल्या आहेत. शिवाय चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली आहे की, हा चित्रपट पाहण्यासाठी प्रदर्शनाच्या दिवशी म्हणजेच १० ऑगस्ट रोजी चेन्नई शहरातील काही खाजगी ऑफिसनी कर्मचार्यांना सुट्टी जाहीर केली आहे. काही कंपन्यांनी तिथे आपल्या कर्मचार्यांना चित्रपटाचे मोफत तिकीटही दिले आहे. पायरसीला आळा घालता यावा, यासाठी काही कंपन्या मोफत तिकीट वाटप करत आहेत.
रजनीकांत हे दोन वर्षांनंतर पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. जेलरमध्ये रजनीकांत पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तमन्ना भाटिया आणि अभिनेत्री राम्या कृष्णन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.