दबाव वृत्त: कल्याण शिळ दरम्यान प्रवासी तसेच वाहन चालकांना महत्त्वाची सूचना पलावा जंक्शन येथील देसाई खाडीवर पुलाच्या कामासाठी एम.एस.आर.डी.सीच्या माध्यमातून कल्याण फाट्याकडून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर दिनांक ८ ते १४ ऑगस्ट २०२३ दरम्यान रात्री १०.०० वा. ते स. ६.०० वाजेपर्यंत सिमेंट गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. या वेळेदरम्यान जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी कल्याण फाटा-कल्याण हा मार्ग पूर्णपणे बंद राहणार असून कृपया वाहनचालक आणि प्रवाशांनी या काळात पर्यायी मार्गाचा वापर करावा.
जाहिरात
जाहिरात