संगमेश्वर/शास्त्रीपूल – पर्शराम लक्ष्मण शिंदे. रा. (शिवने) यांच्या मालकीच्या असलेला क्षेत्रातील सर्वे नं 3 हि.नं. 1 मधील काजु झाडे साफ करण्याकरिता मनाई व बिगर मनाई अशी जंगली झाडे तोडली व जळावु घरगुती लाकूड तयार केले. परंतु सचिन चंद्रकांल खेडेकर याने माझ्या मालकीच्या सर्वे. 8 हि.नं मधील झाडे 4 पर्शराम ल.शिंदे यांनी तोड केली अशी तक्रार वनविभाग देवरुख यांच्याकडे दिली.
तक्रारीनुसार वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी श्री. मुल्ला यानी आपल्या सरकारी सहकाऱ्यासह घटनास्थळी भेट दिली आणि झाडे तोडण्यासंदर्भात कोणतीही विचारपुस न करता श्री. पर्शराम ल. शिंदे यांना घटनास्थळी बोलवुन त्यांच्याशी झाडे तोडण्यासंदर्भात चौकशी केली असता शिंदे यांनी माहिती दिली की माझ्या जागेतील स्वतःच्या मालकीची काजू झाडे साफसफाई करताना काही इतर झाडे काजुच्या झाडाना अडचण होत असल्यामुळे मी झाडाची तोड केली व घरगुती जळाव तयार केला.
अशी माहिती शिंदे यांनी वनअधिकारी श्री. मुल्ला यांना दिली. तसेच तक्रारदार – श्री. सचिन चंद्रकांत खेडेकर यांनी माझ्या मालकीचे असलेले क्षेत्र सर्वे 8. हिनं.4 मधील झाडे शिंदे यांनी तोड केली अशी लेखी तक्रार दिली त्या तक्रारीमध्ये सर्वे तक्रारदार यानी सर्वे नं. 8. हि.नं.4 चा नकाशा तक्रारीत जोडलेला नाही. तसेच कोणतेही कागदपत्र म्हणजेच तक्रारदाराचे क्षेत्र कुठे आहे याचा उल्लेखच होत नाही. तरिसुद्धा वनपाल अधिकारी श्री मुल्ला वनरक्षक श्री. पाटील व त्यांचे सहकारी यानी शिंदे यांच्या मालकी जागेत असलेले लाकूड तक्रारदार सचिन खेडेकर यांच्या घराच्या अंगणात नेऊन ठेवले आहे.
या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी संगमेश्वर शिवणे गावातील रहिवासी पर्शराम ल. शिंदे यांनी केली आहे.