चांद्रयान-३ ने टिपला चंद्राचा पहिला फोटो, इस्रोने जारी केला व्हिडीओ..

Spread the love

श्रीहरीकोटा- चांद्रयान-३ ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर रविवारी इस्रोने एक व्हिडीओ जारी केला. या व्हिडीओमध्ये ‘चांद्रयान-३’ मधून चंद्राचे फोटो दाखवण्यात आले आहेत.

इस्रोने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, ‘चांद्रयान-३’ मोहिमेतील चंद्राचे दृश्य, जेव्हा ते ५ ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत स्थापित झाले होते. व्हिडीओच्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या फोटोमध्ये चंद्र निळ्या-हिरव्या रंगात दिसत आहे. चंद्रावर अनेक खड्डेही दिसत आहे. आज चांद्रयान चंद्राच्या आणखी जवळ जाणार आहे. चांद्रयान सध्या चंद्राच्या पृष्ठभागापासून 170 किमी x 4313 किमी अंतरावर आहे.

याआधी शुक्रवारी म्हणजेच 4 जुलै रोजी चांद्रयान-3 ने पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील दोन तृतीयांशपेक्षा जास्त अंतर कापले होते. एका दिवसानंतर म्हणजे 5 ऑगस्ट रोजी हे यान चंद्राच्या कक्षेत दाखल झाले. चांद्रयान-3 चे प्रक्षेपण 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आले. चांद्रयान-3 9 ऑगस्ट रोजी दुपारी 2 च्या सुमारास तिसऱ्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. यानंतर 14 ऑगस्टला चौथ्या आणि 16 ऑगस्टला पाचव्या कक्षेत ढकलण्यात येईल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page