चंद्र आज सिंह राशीत: ‘या’ राशींचा होणार नोकरी-व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा, वाचा राशीभविष्य…

Spread the love


आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य (Horoscope) कसं असेल, जाणून घ्या सरिता शर्मा यांच्या आजच्या  राशीभविष्यात.

मेष (ARIES) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचव्या भावात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक थकवा जाणवेल. आज शक्यतो प्रवास टाळावा. हट्टीपणा सोडून द्यावा. पोटाच्या तक्रारी उदभवतील, तेव्हा प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. संततीची काळजी राहील. कामात यश लाभेल. कामाच्या धावपळीमुळं कुटुंबीयांसाठी वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळं त्यांच्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे.

वृषभ (TAURUS) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. संपत्तीपासून लाभ मिळेल. वडील आपणांशी खूप चांगल्या रीतीनं वागतील. खेळाडू आणि कलाकारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. त्यांना आपलं कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. संततीसाठी खर्च करावा लागेल.

मिथुन (GEMINI) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसऱ्या भावात असेल. आजचा दिवस नवीन योजना अंमलात आणण्यासाठी अनुकूल आहे. नोकरीत वरिष्ठ अधिकार्‍याकडून किंवा सरकारकडून परिश्रमाचा योग्य मोबदला मिळेल. शेजारी, भावंडे, मित्रमंडळ यांच्यासह आनंदात वेळ घालवाल. नशीबाची साथ मिळेल. जवळपासचा प्रवास होईल.

कर्क (CANCER) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसऱ्या भावात असेल. आज गैरसमज आणि नकारात्मक व्यवहार आपल्या मनात येतील. प्रकृतीचा विशेषतः डोळ्यांचा त्रास होईल. कुटुंबियांशी मतभेद होतील. कामासंबंधी समाधानाची भावना निर्माण होईल. धन खर्च होईल. अवैध प्रवृत्तीकडं झुकणार्‍या मनाला ताब्यात ठेवावं लागेल. विद्यार्थ्यांना विद्यार्जनात अपेक्षित सफलता मिळणार नाही.

सिंह (LEO) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आज कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घेऊ शकाल. वडील आणि वडीलधार्‍यांचा सहवास लाभेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. स्वभावात संताप आणि वागण्यात तापटपणा राहील. त्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. डोकेदुखी, पोटाचे आजार बळावतील. दांपत्य जीवनात माधुर्य राहील.

कन्या (VIRGO) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बाराव्या भावात असेल. आपल्या अहंपणामुळं आज भांडण होण्याची शक्यता आहे. शारीरिक आणि मानसिक चिंतेत दिवस जाईल. स्वभावातील उतावळेपणामुळं काम बिघडण्याची शक्यता आहे. कुटुंबीय आणि मित्रांशी पटणार नाही. अचानक पैसा खर्च होईल. मांगलिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल. कोर्ट-कचेरी आणि नोकरांपासून जपून राहावं लागेल.

तूळ (LIBRA) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात असेल. आजचा दिवस शुभफलदायी आणि लाभदायी आहे. मित्रांशी भेट होऊन त्यांच्यासह फिरायला जाल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. पत्नी आणि संततीकडून सुखा-समाधानाचा अनुभव येईल. नोकरी-व्यवसायात उत्पन्न वाढेल. व्यापारात विकासाच्या संधी मिळतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. दांपत्य जीवनात उत्तम वैवाहिक सुख मिळेल.

वृश्चिक (SCORPIO) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशम भावात असेल. आज कौटुंबिक जीवनाची सार्थकता आपल्या लक्षात येईल. घरात आनंदाचं वातावरण राहील. प्रत्येक काम विनासायास पार पडेल. व्यापार्‍याना व्यापारात चांगल्या संधी प्राप्त होतील. उत्पन्न वाढेल. नोकरी-व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. उच्च अधिकारी आणि वडीलधार्‍यांचा सहवास लाभून त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळेल. संततीकडून समाधान मिळेल. मान, प्रतिष्ठा वाढेल.

धनू (SAGITTARIUS) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात असेल. आज आपणाला प्रकृतीकडं लक्ष द्याव लागेल. कामात उत्साहाचा अभाव राहील. मन चिंतायुक्त राहील. संततीची समस्या हे त्याचे कारण असू शकते. नोकरी – व्यवसायात त्रास होईल. जोखमीचे विचार, व्यवहार ठरविण्यापूर्वी पूर्ण विचार करण्याची आवश्यकता आहे. कामात फार कमी प्रमाणात यश मिळेल. उच्च अधिकारी आणि विरोधक यांच्याशी वादविवादात पडू नये.

मकर (CAPRICORN) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टम भावात असेल. आज नकारात्मक विचार प्रभावी होऊ देऊ नका. भागीदारांशी संबंध बिघडतील. अचानक प्रवास करावा लागेल. त्यावर खर्च करावा लागला. नवे संबंध प्रस्थापित करणं हिताचठरणार नाही. संतापावर काबू ठेवल्यामुळं अनेक संकटांपासून वाचाल. आहारावर विशष लक्ष न दिल्यास प्रकृती बिघडेल. व्यवस्थापन कार्यात आपले नैपुण्य दाखवाल. अचानक धनलाभ होईल.

कुंभ (AQUARIUS) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातव्या भावात असेल. आजचा दिवस प्रसन्नतेचा आहे. आपला आत्मविश्वास वाढल्याने कामात यश मिळणं सहज शक्य होईल. स्वभावातील मौजवृत्ती मनाला स्फूर्ती देईल. भिन्नलिंगी व्यक्तीशी परिचय होऊन त्याचे परिवर्तन प्रणयात होण्याची शक्यता आहे. जवळचा प्रवास घडेल. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा वाढेल. स्वादिष्ट भोजन, वस्त्र आणि वाहनसुख मिळेल. भागीदारीत लाभ होण्याची शक्यता आहे.

मीन (PISCES) : चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहाव्या भावात असेल. मनाचा खंबीरपणा आणि आत्मविश्वासमुळं आपली कामे यशस्वी होतील. कुटुंबात सुख-शांती, आनंदाचं वातावरण राहील. राग आणि बोलण्याची उद्धट पद्धत यांवर संयम ठेवा. नोकरीत वर्चस्व राहील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. आजारी व्यक्तीची प्रकृती सुधारेल. शारीरिक, मानसिक स्वास्थ्याचा अनुभव येईल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page