
महाराष्ट्र : रत्नागिरी व रायगड सह राज्यातील पुणे सातारा आणि नंदुरबार या जिल्ह्यात येत्या चार तासात वीजांच्या कडकडाटसह वादळी पाऊस पडेल असा अंदाज मुंबई येथील वेधशाळेने व्यक्त केला आहे. या कालावधीत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारा वाहण्याची शक्यता या जिल्ह्यांमध्ये काही तुरळक ठिकाणांवर असल्याचे वेध शाळेने जारी केलेल्या बातमीपत्रात म्हटले आहे.
या संदर्भात नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा
जाहिरात
