
सिंधुदुर्ग ; मागील दोन ते तीन दिवसांपासून मुंबई आणि नवी मुंबई परिसरा पावसानं काहीशी विश्रांती घेतली होती. हवामान विभागानं विदर्भासह कोकणात वर्तवलेल्या इशाऱ्याप्रमाणं पावसाची हजेरी पाहायला मिळाली.असं असतानाच राज्याच्या उर्वरित भागात आता हा वरुणराजा पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे.
पुणे वेधशाळेचे महासंचाक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढचे चार ते पाच दिवस पावसाची हजेरी असणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार, तर मराठवाडा आणि इतर काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.