मुंबई : मध्य रेल्वेने होळी सणासाठी प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी ९० विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी मुंबई ते सुरतकल दरम्यान ६ होळी विशेष चालवण्याची घोषणा केली.त्यानंतर आज दादर आणि बलिया/गोरखपूर दरम्यान ३४ होळी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच, नागपूर आणि मडगाव दरम्यान १० हॉलिडे स्पेशल सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
होळी सणासाठी अनेकजण आपल्या गावची वाट धरतात. त्यामुळे प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर गर्दी जमते. त्यामुळे प्रवाशांची ही अतिरिक्त गर्दी लक्षात घेत लोकमान्य टिळक टर्मिनस-समस्तीपूर/मडगाव, पुणे – दानापूर/अजनी/करमळी आणि पनवेल – करमळी दरम्यान अतिरिक्त ३४ होळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. तसेच, पूर्व मध्य रेल्वेने मुंबई आणि जयनगर दरम्यान ६ होळी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. त्यामुळे या वर्षी घोषित होळी विशेषची एकूण संख्या ९० आहे.
जाहिरात :