मुंबई :- गणपती सणाकरिता काेकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या साेयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनातर्फे १५६ गणपती विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. या गणपती विशेष गाड्या मुंबई ते सावंतवाडी रोड, लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ-, दिवा ते रत्नागिरी आणि मुंबई ते मडगाव दरम्यान धावणार आहेत .
या १५६ गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण २७ जून २०२३ पासून रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळावर सुरु होणार आहे. त्यामुळे गणपती सणाकरिता काेकणात जाणाऱ्या चाकरमान्याना मोठा दिलासा मिळणार आहे.मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ट्रेन क्रमांक ०११७१ मुंबई-सावंतवाडी रोड गणपती स्पेशल ट्रेन सीएसएमटी येथून १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ पर्यत (२० फेऱ्या) पर्यंत दररोज रात्री १२. २० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी २. २० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.ट्रेन क्रमांक ०११७२ विशेष सावंतवाडी रोडवरून १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत २० फेऱ्या दररोज दुपारी ३.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ४.३५ वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. एलटीटी ते कुडाळ विशेष गाडीच्या २४ फेऱ्या धावणार आहे.ट्रेन क्रमांक ०११६७ स्पेशल एलटीटी १३, १४, १९, २०, २१, २४ ते २८ सप्टेंबर रोजी रात्री १०.१५ वाजता सुटेल. ट्रेन क्रमांक ०११६८ स्पेशल कुडाळ येथून १४, १५, २०, २१, २२, २५ ते २९ आणि ऑक्टोबर २, ३ रोजी रात्री १०.३० वाजता सुटेल. त्याच दिवशी रात्री ९.५५ वाजता एलटीटीला पोहोचेल.
पुणे-करमाळी/कुडाळ-पुणे विशेष गाडीच्या ६ फेऱ्या धावणार आहेत. ट्रेन क्रमांक ०११६९ विशेष गाडी १५, २२ आणि २९ सप्टेंबर रोजी पुण्याहून सायंकाळी ६.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता कुडाळला पोहोचेल. तर ट्रेन क्रमांक ०११७० स्पेशल कुडाळहून १७, २४ आणि १ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.०५ वाजता सुटेल आणि पुण्याहून दुसऱ्या दिवशी ५.५० वाजता पोहोचेल.
करमाळी-पनवेल-कुडाळ विशेष (साप्ताहिक)गाडीच्या ६ फेऱ्या धावणार आहेत. ट्रेन क्रमांक ०११८७ ही गाडी १६, २३ आणि ३० सप्टेंबर रोजी करमाळी येथून दुपारी २.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २.४५ वाजता पनवेलला पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०११८८ स्पेशल पनवेलहून १७, २४ आणि १ ऑक्टोबर रोजी ५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी २ वाजता कुडाळला पोहोचेल.
दिवा -रत्नागिरी मेमू स्पेशल (दैनिक) गाडीच्या ४० फेऱ्या धावणार आहेत. ट्रेन क्रमांक ०११५३ स्पेशल दिवा येथून १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान ७.१० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी २.५५ वाजता रत्नागिरीला पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०११५४ विशेष गाडी १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान दुपारी ३.४० वाजता रत्नागिरीहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०.४० वाजता दिवा येथे पोहोचेल.
मुंबई- मडगाव विशेष (दैनिक) गाडीच्या ४० फेऱ्या धावणार आहेत. यामध्ये ट्रेन क्रमांक ०११५१ स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत दररोज ११.५० वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी २.१० वाजता मडगावला पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०११५२ स्पेशल मडगावहून १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर रोजी दररोज ३.१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी ५.०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.
असे करा आरक्षण-
१५६ गणपती विशेष गाड्याचे आरक्षण २७ जून २०२३ पासून रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळावर सुरु होणार आहे.