
ठाणे : निलेश घाग रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन गर्दीच्या स्थानकांतील प्लॅटफॉर्मवर वरील उपहारगृह हटविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
सर्वाधिक प्रवासी CSMT स्थानकातील आहेत. त्यानंतर ठाणे कल्याण, घाटकोपर, डोंबिवली, कुर्ला, पनवेल आणि दादर येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे.उपनगरी रेल्वे गाडय़ांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी होते. त्यात प्लॅटफॉर्मवरील उपहारगृह (स्टॉल) अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ते हटवण्यासाठी नियोजन प्रशासन करीत आहे असे सूत्रांनी सांगितले.

मध्य रेल्वेवर दररोज ४० लाखांहून अधिक जण प्रवास करतात.
मध्य रेल्वेवरील इतर गर्दीच्या स्थानकांतही अशीच स्थिती आहे. गर्दीच्या वेळी प्रवाशांना फलाटावर पाऊल ठेवण्यासही जागा नसते. प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी स्टॉल हटविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. गर्दीच्या स्थानकांवरील उपहारगृह (स्टॉल) हटवण्याबाबत नियोजन सुरू आहे. मात्र यावर अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले.
जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात