
संगमेश्वर /अर्चिता कोकाटे- संगमेश्वर मधील रामपेठ या ठिकाणची केंद्र शाळा संगमेश्वर नंबर दोन मध्ये नवागतांचे स्वागत शाळेच्या वतीने करण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वारावर बालकांच्या पायाचे ठसे उमटवून स्वागत व आरती ओवाळून त्यावेळी मान्यवर म्हणून नावडीच्या सरपंच प्रज्ञा कोळवणकर , उपसरपंच विवेक शेरे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सचिन शेरे,माता पालक सदस्य सौ. कुष्टे, सौ सुर्वे, सौ. लिंगायत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजया तांबडे आदी उपस्थित होते.



शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्नेहा भिडे यांनी गुलाब पुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत केले तसेच मुलांना आरती ओवाळून पुष्प देऊन चिमुकल्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मुलांना शाळेच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी पुस्तके वाटप, गणवेश वाटप व खाऊ वाटप करण्यात आले.
मुख्याध्यापिका श्रीमती भिडे यांनी मनोगत व्यक्त करून बालकांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्या निमित्ताने कायदा साथी दिनेश अंब्रे यांनी आपल्या शाळेला भेट देऊन पुष्प व शैक्षणिक साहित्य देऊन मुलांचे स्वागत केले शाळेच्या वतीने उपशिक्षिका रेखा जाधव, प्राची चोचे यांनी मान्यवरांचे आभार मानले.