संगमेश्वर | मार्च २०, २०२३.
फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्रात आज दि. २० मार्च रोजी भाजपा युवा मोर्चा (द. रत्नागिरी) जिल्हा उपाध्यक्ष श्री. अविनाश गुरव यांच्या माध्यमातून माजी खासदार व भाजपा प्रदेश सचिव डॉ. निलेश राणे तसेच तालुकाध्यक्ष श्री. प्रमोद अधटराव यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळवाटप करण्यात आले.
सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनतेची सेवा करणे आणि आपले नेतृत्त्व घरोघरी पोहचवणे हा उदात्त हेतू डोळ्यांसमोर ठेऊन हा कार्यक्रम आयोजित केला. गरजू रुग्णांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणेबाबत वैद्यकीय अधिकारी नेहमीच पुढाकार घेतात ही गोष्ट आम्ही प्रत्येक ठिकाणी जाणून घेतो. याबाबत मी त्यांचे मनःपूर्वक कौतुक करतो असे श्री. अविनाश गुरव यांनी प्रतिपादन केले. प्रातिनिधिक स्वरुपात रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या फळवाटप कार्यक्रमाचे कौतुक करत श्री. गुरव यांचे आभार मानले. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी प्रस्तावित नूतन इमारतीबाबत माहिती दिली. यावेळी वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका, तसेच अन्य वैद्यकीय कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.