मुंडे महाविद्यालयात ‘जागतिक पर्यावरण दिन’ उत्साहात साजरा…

Spread the love

मंडणगड(प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभाग, भूगोल विभाग व निसर्ग मंडळाच्या  संयुक्त विद्यमाने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक श्री. संतोष चव्हाण, प्रभारी प्राचार्य डॉ. विष्णु जायभाये, डॉ. अशोक साळुंखे, डॉ. शैलेश भैसारे आदी  मान्यवर उपस्थित होते. प्रभारी प्राचार्य डॉ. विष्णु जायभाये यांनी सुरूवातीस उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले तर डॉ. शैलेश  भैसारे यांनी जागतिक वृक्षारोपणाविषयी थोडक्यात माहिती सांगितली. यावेळी संचालक श्री. संतोष  चव्हाण म्हणाले की, आज जागतिक पर्यांवरण दिन जगभर साजरा करण्यात येत आहे. पर्यावरणाचा -हास होत असल्याने आज समाजामध्ये पर्यावरणविषयक जनजागृती करणे गरजेचे आहे.

खरे तर वृक्षारोपणाबरोबच वृक्षसंवर्धन ही आज काळाची गरज बनली असून महाविद्यालयीन युवकांनी आपापल्या परिसरात निदान एकतरी झाड लावून पर्यावरणाचे रक्षण करावे असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वड, पिंपळ, जांभूळ, चिंच ही रोपे लावण्यात आली. शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. अशोक साळुंखे यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, एन.एस.एस.स्वयंसेवक उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page