
मंडणगड (प्रतिनिधी)दि. :येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांचा स्मृतिदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विष्णु जायभाये उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सहकार्यवाह श्री. विश्वदास लोखंडे, डॉ. शैलेश भैसारे, प्रा. प्रितेश जोशी, प्रा. साई पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या पुतळयास सहकार्यवाह श्री. विश्वदास लोखंडे व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी डॉ. शैलेश भैसारे यांनी उपस्थितांचे स्वागत करुन कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला.
यावेळी सहकार्यवाह श्री. विश्वदास लोखंडे यांनी सांगितले की सर्व समाजाला बरोबर घेवून समाजजागृती करणारे नेतृत्व म्हणजेच लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब होय. अशा प्रकारच्या तळागाळातून उगवलेल्या नेतृत्वाची आज महाराष्ट्राला नितांत गरज आहे. मुंडे साहेबांसारखा समाजभिमुख लोकनेता आपणास कुठेच दिसत नाही. समाजाला एकत्र करण्याची ताकत त्यांच्यात होती.
समाजातील गोपीनाथजी मुंडे साहेबांचा राजकीय प्रवास हा सतत संघर्षमय राहिलेला आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
अध्यक्षिय समारोप करताना प्रभारी प्राचार्य डॉ. विष्णु जायभाये यांनी मुंडे साहेबांच्या कार्याविषयी थोडक्यात ओळख करुन देताना समाजातील प्रत्येक घटकांबरोबर त्यांची नाळ जोडलेली होती. त्यांच्या कार्याचा आदर्श आजच्या पिढीने घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास मंडणगड परिसरातील नागरिक, हितचिंतक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शैलेश भैसारे यांनी केले तर आभार प्रा. प्रितेशी जोशी यांनी मानले.
फोटो:- M 04 लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन
अभिवादन करताना मान्यवर
मंडणगड प्रतिनिधी