
दिल्ली- शुक्रवार १२ मे रोजी सीबीएसई (CBSE 12th Result 2023) बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यानुसार यंदा बारावीमध्ये ८७.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. या परीक्षेत ९०.६८ टक्के मुली तर ८४.६७ टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत.
यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत घट
मागील वर्षी सीबीएसई बोर्डात एकूण ९१.२५% मुले उत्तीर्ण झाली होती, तर यावर्षी फक्त ८४.६७% मुले उत्तीर्ण झाली आहेत. गेल्या वर्षी ९४% विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या होत्या, तर यावर्षी केवळ ९०.६८ % विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. म्हणजेच यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत घट झाली आहे. (CBSE 12th Result 2023)
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE 12th Result 2023) cbse.gov.in आणि cbseresults.nic.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी बारावीचे निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर टाकावा लागेल.