
मुंबई- आई प्रतिष्ठान वतीने चेंबूर येथील अफॅक इंग्लिश स्कूल आणि ज्यु.कॉलेज येथे दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी करिअर मार्गदर्शन तज्ञ देवेंद्र ताम्हणे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या वाटा आणि पुढील शैक्षणिक मार्ग निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना श्री देवेंद्र ताम्हणे यांनी महत्वाचे मार्गदर्शन केले.यावेळी प्रा. किशोर घोडके सर (संस्थापक ऐम क्लासेस) विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
विसाजी लोके यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रुचिता बोलारे यांनी केले.शिबिराचे उद्घाटन शिवसेना चित्रपट सेना-अध्यक्ष, शिवसेना सचिव श्री सुशांत शेलार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले व त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर चेंबूर विधानसभा प्रमुख रवींद्र महाडिक उपविभाग प्रमुख भास्कर चव्हाण, प्रशांत पटेल, महिला उपविभाग प्रमुख आशा आक्से, अंजू थकवाणी, विधानसभा संघटक लक्ष्मण तांडेल पुरुष शाखाप्रमुख कीर्ती सिंग राणा, जयंत देसाई, तुषार सामंत, रवी सिंग, राहुल कांबळे शाखाप्रमुख माया कांबळे, राजश्री गोंधळेकर, किशोरी कडू, रत्नमाला तुरुकमारे, अक्षता म्हात्रे, युवासेना विधानसभा प्रमुख सत्यवान पांचाळ, उपविभाग प्रमुख प्रितेश खीर तसेच युवा सैनिक व शिवसैनिक उपस्थित होते.