दिवा आगासन येथील महापालिका आरक्षण रद्द करा; ग्रामस्थांच्या निर्धार सभेला अलोट गर्दी ;

Spread the love

ठाणे : निलेश घाग आगासन गावात ठाणे महानगरपालिकेने टाकलेल्या विविध सेवा सुविधांच्या आरक्षणाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी रविवारी सभा घेऊन ठाम विरोध दर्शवला आहे . या सभेत शेतकऱ्यांच्या भूखंडावरील टाकण्यात आलेले आरक्षण रद्द करावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालावे असे यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी म्हटले.

दिवा आगासन आरक्षणाचा मुद्दा पेटणार??

आगासन गावातील ३० वर्षापूर्वीची राहती घरे व खाजगी शेत जमिनींवर आरक्षण ठाणे महापालिकेने टाकल्या विरोधात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला मार्गदर्शक म्हणून राजाराम पाटील , संतोष केणे , गजानन पाटील, आगासन गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष रोहिदास मुंडे,वंदनाताई गौरी, गुरुनाथ नाईक , विनोद भगत, तुषार पाटील, रेशमाताई पवार , मधुकर माळी, प्रेमनाथ पाटील साहेब, महेश संते , दयानंद म्हात्रे, प्रभात पर्व न्यूज चे संपादक सागर राजे , इतर प्रसार माध्यमे तसेच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व आगासन गावातील जवळपास ५०० हून अधिक पेक्षा स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. आगासान गावातील ग्रामस्थांनी या आरक्षणाला विरोध दर्शविला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, खासदार, खासदार तसेच मा.मुख्यमंत्री यांनी घटनास्थळी भेट देऊन आरक्षण तात्काळ रद्द करावे अशी भूमिका ग्रामस्थानी केली आहे तसे न झाल्यास येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार तसेच तीव्र आंदोलन छेडले जाईल, तसेच आगरी कोळी संघर्ष समिती आगासन दातिवली, बेतवडे, म्हातार्डी, दिवा व साबे) यांनी आरक्षणाला विरोध आहे असे समर्थन पत्र दिले आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील आगासन ग्रामस्थांना पाठिंबा दिला आहे. दिवा मनसेच्या वतीने शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी या आरक्षणाला विरोधाचे समर्थन पत्र आगासन गाव संघर्ष समितीला दिले आहे.

ठाणे पालिकेने आम्हाला जास्त मोबदला दिला तरी आम्ही आमची जागा सोडणार नाही. दिवा शहरात विविध ठिकाणी अजूनही आरक्षित जागा शिल्लक आहेत. त्यातील शासकीय हॉस्पीटलची जागा, प्रभाग समिती कार्यालयाची जागा अजून रिकामी असून त्या जागा पालिकेने घेऊन त्यावर हॉस्पीटल आणि प्रभाग समिती कार्यालये उभारावीत. आम्ही आमची जागा देणार नाही.

पहा नक्की कुठे आहे आरक्षण…..

आगासन गावातील १३ हेक्टर मध्ये टाकलेला आरक्षण हा
अन्यायकारक आहे. महापालिकेने तातडीने हा आरक्षण हटवावा
अन्यथा ग्रामस्थांचा उग्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल.
– रोहिदास मुंडे, अध्यक्ष, आगासन गाव संघर्ष समिती

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page