- प्रमोद जठार , मा आमदार
जनशक्तीचा दबाव न्यूज नेटवर्क
कणकवली : रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये रिफायनरीसंबंधी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने समिती गठीत करण्यात आली आहे. राजापूर येथे भुवनेश्वरच्या धर्तीवर कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्यासंदर्भात बैठक घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली होती. त्यानुसार, झालेल्या बैठकीनंतर ही कार्यवाही सुरू झाली असून, जठार यांच्या मागणीला यश आले आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जठार यांच्या मागणीनुसार बैठक घेत, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षणामध्ये
रिफायनरीसंबंधी अल्प व्यवसाय व दीर्घमुदतीचे व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार, समिती गठीत करण्यात आली आहे. यात रत्नागिरीचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस.जी. कोतवडेकर अध्यक्ष आहेत.
सहायक आयुक्त श्रीमती शेख, औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी (मुलींची) चे प्राचार्य पी.एस. शेटये हे सदस्य असणार आहेत. या अनुषंगाने संबंधित समितीने चार दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.