ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग) ठाण्यात शुक्रवारी आणि शनिवारी (२४ आणि २५ मार्च) पाणीपुरवठा विषयक दुरुस्ती कामामुळे ठाण्यातील काही विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. ठाण्यात २४ आणि २५ मार्चला अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा होणार नाही. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन विभागातील नागरिकांना केले आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत नवीन टाकलेल्या बारवी गुरुत्व वाहिन्या कार्यान्वित करण्याचे तातडीचे काम हाती घेतल्यामुळे शुक्रवारी आणि शनिवारी (२४ आणि २५ मार्च) दुपारी १२ पर्यंत एकूण २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट जनशक्तीचा दबावर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा