तीस ते पस्तीस जणांच्या टोळक्याने दोन व्यावसायिकांच्या वादातून लक्झरी बसवर दगडफेक करत गोळीबारही केल्याची घटना घडली आहे.
पेण : पेण तालुक्यातील कोपर फाटा येथील हॉटेल मिलन पॅलेस समोर दोन नंबरच्या धंदेवाल्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचे पहायला मिळाले आहे. यामध्ये तीस ते पस्तीस जणांच्या टोळक्याने दोन व्यावसायिकांच्या वादातून लक्झरी बसवर दगडफेक करत गोळीबारही केल्याची घटना घडली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे लक्झरीतील प्रवाशांनाही मारहाण करण्यात आली आहे. वृद्ध, महिला यांनाही या अवैध धंदेवाल्यांनी सोडले नाही. एका एका प्रवाशाला चार-चार ते पाच जण मारहाण करत होते. सोडवायला गेलेल्या इतर प्रवाशांचे दागिनेही लुटण्यात आले आहेत.
पहाटेपासून हा थरार सुरु होता. लुटालुट झाल्याने ती लक्झरी आणि त्यातील प्रवाशी अजूनही तिथेच थांबले आहेत. हे प्रवासी दापोली वरून बोरीवलीला जात होते. यावेळी तीन चार गाड्यांमधून आलेल्या ३०-३५ या लोकांनी त्यांना मारहाण केली. महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र, चैन, तिच्या पतीच्या गळ्यातील चैन आदी गोष्टी या लोकांनी हिसकावून नेल्या आहेत.
जाहिरात :