नवी दिल्ली :- अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील धार्मिक विधींना मंगळवारपासून सुरूवात झाली आहे. सोमवार २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवार २२ जानेवारीला संपूर्ण भारतातील केंद्र सरकारी कार्यालयांना अर्धी सुट्टी जाहीर केली आहे. या संदर्भातील वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवार २२ जानेवारी रोजी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, सर्व कार्यालये अर्धा दिवस बंद राहतील. त्यानंतर दुपारी २.३० नंतर कार्यालये सुरू होतील, अशी माहिती दिली आहे. तसेच काही राज्यांमध्ये शैक्षणिक संस्थांना सुट्टी देण्यात आली आहे. मद्यविक्री बंद ठेवण्यात आली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, गोवा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, हरीयाणा यांचा समावेश आहे.
सोमवार २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होत आहे. त्या दिवशी अयोध्येसह देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना विविध कार्यक्रमात सहभागी होता यावे म्हणुन केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी दिली आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय केंद्र सरकारची सर्व कार्यालये, केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व संस्था आणि आस्थापनांना लागु आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे.
२२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पार पडणार आहे. दरम्यान, १६ जानेवारीपासुन अयोध्या मंदिर परिसरात विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या दिवशी उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, आसाम, छत्तीसगड, उत्तराखंड,
हरियाणा या राज्यांमध्ये मद्यविक्री बंद ठेवण्यात आली आहे. तर काही राज्यांमध्ये शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. लखनऊ विद्यापीठाचे वेळापत्रक बदलुन परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेश विधान परिषदेसाठी होत असलेली पोटनिवडणुक देखील एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे.
जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात