सिधुदुर्ग : ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.खासदार विनायक राऊत यांनी वैभव नाईक यांची जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी केली आहे. वैभव नाईक यांच्या उचलबांगडीनंतर सिंधुदुर्गात तीन जिल्हाप्रमुखांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये संदेश पारकर, सतीश सावंत आणि संजय पडते यांचा समावेश आहे. आमदार वैभव नाईक शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा असल्याने जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. परंतु, आपल्याकडे पक्षवाढीचं काम दिल्यामुळे जिल्हाप्रमुख पद दुसऱ्या व्यक्तीकडे देण्यात आल्याचे वैभव नाईक यांनी म्हटले आहे.
वैभव नाईक यांची जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी केल्यानंतर विरोधकांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केलीय. ” नव्याने नियुक्त केलेले तिन्ही जिल्हाप्रमुख आधीचे राणे समर्थक असून ठाकरे गटाकडे निष्ठावंतांना डावलून राणे समर्थकाना दिली जातात, अशी टीका केली जात आहे.