ब्रेकिंग न्यूज- मुसळधार पावसामुळे शास्त्री नदीला पाणी, शास्त्री नदीचे पाणी रस्त्यावर, संगमेश्वर बाजारपेठेत जाणारी वाहतूक बंद…

Spread the love

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांनी सतर्क राहावे….

संगमेश्वर/ दिनेश आंब्रे- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या अति मुसळधार आधार पावसामुळे नदी पातळी मध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सर्वच तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस होत आहे. संगमेश्वर तालुक्यातील महत्त्वाचे शास्त्री नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली असून पाणी संगमेश्वर आठवडा बाजार येथील रस्त्यावर आले आहे. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आलेली आहे . लोकांनी सतर्कतेचा इशारा बाळगावा व आपली काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येते.

पाणी बरंच चालल्याने व्यापाऱ्यांचे सामान काढण्याचे धावपळ झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे व्यापारची तारांबळ उडाली आहे. शाळा अंगणवाडी व कामावर जाणाऱ्या लोकांचे पावसामुळे नुकसान झालेले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांनी सतर्क राहावे….

पुढील ३ ते ४ तासांच्या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अचानक होणाऱ्या जोरदार सरी, वाऱ्याचा वेग वाढणे, विजांचा कडकडाट यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सखल भागांमध्ये पाणी साचणे, लहान नद्या व नाल्यांना पूर येण्याची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, घराबाहेर न पडण्याचे व सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन केले आहे. तसेच, मासेमारी, शेतीकामे वा ओढ्याजवळील हालचाली काही वेळ थांबवाव्यात, अशी सूचनाही देण्यात आली आहे.

दरम्यान, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून, संभाव्य धोका लक्षात घेऊन आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनी अधिकृत सूचना आणि स्थानिक प्रशासनाच्या आदेशांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांची पातळी खालील प्रमाणे आहे.

*रत्नागिरी जिल्ह्यातील  पाऊस दिनांक – 15/07/2025…*

१) मंडणगड – 114.00  मिमी
२) खेड –  96.85 मिमी 
३) दापोली – 93.71 मिमी
४) चिपळूण – 134.56  मिमी
५) गुहागर – 111.40   मिमी
६) संगमेश्वर –    142.25  मिमी
७)रत्नागिरी – 143.11  मिमी
८) लांजा –  112.20   मिमी
९) राजापूर – 85.87  मि मि

*आजचा एकूण पाऊस = 1033.95 मिमी*
*आजचा एकूण सरासरी पाऊस – 114.88 मिमी.*

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page